एक लढाई हरलो


एक लढाई हरलो म्हणून काय झालं
अजून युद्ध जिकंण तरी बाकी आहे
आज मागे पडलो म्हणून काय झाल
बरेच जण आज माझ्याही मागे आहेत.

कोण म्हणत "ती नाही म्हणून काय झाल
"तिच्या शीवाय इथे ब-याच जणी आहेत"
पण यालाच प्रेम म्हणतात का जगात
तु घाबरु नकोस मी आजही तुझाच आहे.

तु जवळ नसलीस म्हणून काय झाल
तुझ्या आठवणी माझ्यासाठी खूप आहेत
पण आठवणीसोबत जगता येत का इथे
खरच आज हे एक खूप मोठ गणित आहे.

आज मी तुझा असलो म्हणून काय झाल
पण आज तु नक्की माझी आहेस का ?
मी पळवाटा मुळीच शोधत नाही कधी
हा पण तुझे सगळे मार्ग मोकळे आहेत.

सुधीर .......

मनापासुन ....... मनापर्यंत .........

Comments :

0 comments to “एक लढाई हरलो”